- आयुक्तांच्या परवानगीशिवाय परस्पर लावली ‘टीडीआर’ची विल्हेवाट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 25 जुन 2025) :- रावेत प्राधिकरण येथील गृहनिर्माण बांधकामाच्या मिळकतीवर मोशीतील मिळकतीची हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) खर्ची टाकलेली आहे.
त्या बांधकाम परवानगीची पुढील कार्यवाही केलेली आहे. मात्र, याबाबत आयुक्तांकडून टीडीआर खर्ची न टाकण्याचे आदेश असतानाही संबंधित कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंत्यांनी दिशाभूल केली. त्यामुळे दोघांची पाणीपुरवठा विभागात बदली करून त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता संभाजी गायकवाड बाळासाहेब आणि उपअभियंता दिनेश ज्ञानेश्वर फाटक कार्यरत आहेत. त्यांच्याकडील रावेत येथील बांधकाम परवानगीविषयक आणि तांत्रिक, प्रशासकीय महत्त्वपूर्ण कामकाज सोपविले आहे. मात्र, संबंधित दोन्ही अभियंत्यांकडून रावेत प्राधिकरण येथील मिळकतीवर मोशी येथील मिळकतीवरील टीडीआर खर्ची टाकलेली आहे.










