न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. 27 जुन 2025) :- ऑनलाईन जॉब शोधत असताना महिलेला टेलग्रामवरुन मॅसेज करून विविध टास्कच्या माध्यमातून आर्थिक प्रलोभन देत एकुण ४३,३१,३३६/- रुपयांची ऑनलाईन स्वरुपात फसवणूक करण्यात आली आहे.
हा प्रकार (दि.१२/०३/२०२५ ते दि.०८.०४.२०२५) दरम्यान हिंजवडी येथील अलिशान सोसायटीत घडला.
याबाबत ४५ वर्षीय महिलेने १) महिला आरोपी, २) महिला आरोपी, ३) महिला आरोपी व विविध बँक खाते धारक यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. हिंजवडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन जॉब शोधत असताना फिर्यादी यांना आरोपी क्रं १ व २ यांनी टेलग्रामवरुन मॅसेज करुन<span;> Kapish Gold Jewelry कंपनीचे ऑफिशीअय एजेंन्ट असल्याचे भासवले. लिंक पाठवुन ज्वेलरी बाबत विविध अॅडोडाईजचे टास्क दिले. प्रथम १०,०००रुपये गुंतवण्यास सांगीतले त्यावर त्यांना ५,०००/- फायदा झाला असे सांगुन १५,०००/- परत केले. त्यामुळे तक्रारदार यांचा विश्वास बसला. परत तक्रारदार यांना वरील साईडवर विविध खाते क्रमांक देवुन विविध रकमा पाठवण्यास सांगीतल्याने तक्रारदार यांनी एकुण ४३,३१,३३६/- रुपये ऑनलाईन स्वरुपात पाठवले. ते परत करण्याकरीता विनंती केली असता ८ लाखाची मागणी केल्याने तक्रारदार यांना फसवणुक झाल्याचे लक्षात आले. हिंजवडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर झोल पुढील तपास करीत आहेत.