न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 27 जुन 2025) :- चाकणजवळील नाणेकरवाडी येथे सावकाराच्या त्रासाला वैतागून पिडीत व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
याप्रकरणी पिडीत व्यक्तीच्या 38 वर्षीय पत्नीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
ही घटना (दि. 25 ते 26) सकाळच्या सुमारास घडली. आरोपी 1. विकास अशोक परदेशी ऊर्फ बाली (रा. चाकण), 2 अतुल मोहन रिठे (रा. ठाकुर पिंपरी) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती संतोष हरीभाऊ नाणेकर यांना आरोपी यांनी व्याजाने पैसे देवुन त्याबदल्यात त्यांचेकडुन कोरे चेक घेतले. व्याजापोटी दिलेल्या पैशापेक्षा चौपट पैसे परत देवुनसुध्दा वारंवार पैसे मागुन धमक्या देत त्यांना त्रास दिला आहे. त्यामुळे फिर्यादी यांचे पती संतोष नाणेकर यांनी गळफास घेवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.