- संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांचा वाढदिवस देखील जोमात साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२५) :- सन २०१९ रोजी स्थापन झालेल्या चाकण MIDC उद्योजक संघटनेच (दि. २४ जून) रोजी ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. वर्धापन दिनी दरवर्षीप्रमाणेच या वर्षी देखील भरघोस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान याच दिवशी चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांचा देखील वाढदिवस असतो. दोन्हीही कार्यक्रम गेली सहा वर्ष एकाच दिवशी मोठ्या उत्साहात संघटनेकडून साजरा केला जात असतात.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिराने झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर चालले. सकाळी ११ वाजता आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. मनोरंजनासाठी अभंग ओव्या मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. सकाळी नाष्टा व दुपारी सस्नेह भोजनाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता.
सर्वप्रथम संघटनेचे सचिव निवास माने यांनी उद्योजक संघटनेच्या कार्याचा वर्षभराचा आढावा दिला. संघटनेचे खजिनदार किसन गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर संघटनेचे संचालक दत्तात्रय दगडे, लक्ष्मण काळे, प्रवीण माळी, अभिजीत राऊत, महिला उद्योजकांमध्ये सुनिता गायकवाड, प्रियंका गोरे, शिल्पा पवार आदींनी संघटनेमुळे होत असलेल्या फायद्याचे तसेच आपापल्या अनुभवाचे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास कामगार नेते यशवंत भोसले हे अध्यक्ष म्हणून लाभले. तसेच प्रमुख उपस्थिती ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव बाळासाहेब बोरकर, निघोजे गावचे सरपंच सुनीता येळवंडे, माजी उपसरपंच संतोष येळवंडे, माजी वन अधिकारी रावसाहेब काळे, वस्ताद ताराभाऊ कलापुरे, अहिल्यानगरचे उद्योगपती गुलाबराव म्हस्के, उद्योगपती अनिल भांगडिया, प्रमोद चौधरी, नामदेव पोटे यांची होती. सर्वांनी संघटनेविषयक तसेच चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांच्या विषयी गौरवोद्गार काढले.
या कार्यक्रमात जवळपास ५०० हून अधिक उद्योजकांनी उपस्थिती दर्शविली. २५० पेक्षा जास्त लोकांनी रक्तदान केले, भंडारा डोंगरावर १५१ झाडे लावली. संपूर्ण कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन संचालक प्रवीण शिंदे यांनी केले. सगळ्यात शेवटी चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी मनोगत व्यक्त करताना सगळ्यांचे आभार मानले.