- शहर आम आदमी पार्टीचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे निलख (दि. 01 जुलै 2025) :- पिंपरी-चिंचवड शहर आम आदमी पार्टीच्या वतीने गुरूवारी (दि. ३) रोजी सकाळी साडेअकरा वाजता पिंपळे निलख येथील मुख्य बसस्थानक येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
“शालेय साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ” या उपक्रमामार्फत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येणार असून, परीक्षांमध्ये उज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
शिक्षणाच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलत, समाजात प्रेरणा देणाऱ्या या कार्यक्रमाचे शुभहस्ते अजित फाटके पाटील, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, आम आदमी पार्टी (महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास डॉ. अभिजीत मोरे, सचिव, आम आदमी पार्टी (महाराष्ट्र राज्य) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमाचे आयोजन शहराध्यक्ष रविराज बबन काळे यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. आम आदमी पार्टीच्या सामाजिक भान आणि शिक्षणप्रेमाचे प्रतिक असलेल्या या उपक्रमास स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
















