न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी (दि. ०३ जुलै २०२५) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) दक्षता अधिकारी अमोल तांबे यांची लातूर जिल्हा अधीक्षक पदावर नुकतीच बदली झाली. त्यानंतर उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. राज्य शासनाने त्याबाबत अध्यादेश जारी केला आहे. दोन अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागातील या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या रिक्त झालेल्या जागेवर अद्याप कोणाची नियुक्ती झालेली नाही.
बदली झालेल्यांमध्ये उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे यांची सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात उपविभागीय अधिकारीपदी, तहसीलदार सचिन म्हस्के यांची सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे तहसीलदार म्हणून बदली झाली आहे. कुदळे आणि म्हस्के हे प्रतिनियुक्तीवर पीएमआरडीएमध्ये आले होते.
बदली झालेल्या रिक्त झालेल्या जागांवर अद्याप कोणाची नियुक्ती झालेली नाही. पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागातील अधिकाऱ्यांचा बदल्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम विभागात असलेले अप्पर जिल्हाधिकारी संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता शशिकांत कुलकर्णी ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले. अपर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाल्यानंतर संजय गायकवाड मे महिन्यात पीएमआरडीएमध्ये रुजू झाले होते. त्यानंतर दीड महिन्यात ते सेवानिवृत्त झाले. या पदांबरोबरच कार्यकारी अभियंता शीतल देशपांडे यांची शासनाच्या ग्रामविकास विभागात बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर स्नेहा हब्बू रुजू झाल्या आहेत.