न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जुलै २०२५) :- चिखली कुदळवाडी येथील बालघरे वस्ती, सेक्टर १६ या परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून नागरिक व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने ये-जा करतात. सध्या पावसाळा सुरू असून खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
तातडीने या रस्त्याची डागडुजी करून खड्डे बुजविण्याचे काम हाती घ्यावे, जेणेकरून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतुकीचा लाभ घेता येईल, अशी मागणी माजी स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांनी महापालिका ‘क’ प्रभाग स्थापत्य विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
















