- बांधकाम व्यावसायिक गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२५) :- फार्म हाऊसच्या गेटवर पिस्टलमधुन दोन वेळा फायर केले. स्वतःसह पार्टीसाठी आलेल्या व शेजारी उभ्या असलेल्या लोकांची सुरक्षा धोक्यात आणली. सार्वजनिक शांततेचा भंग करुन दहशत पसरवली.
हा प्रकार (दि.०८) रात्री ११.३० वा.चे सुमारास वृंदावन फार्म हाऊस, सुसगाव येथे घडला. याप्रकरणी फार्म हाऊसचे केअर टेकर देवराम वर्मा यांनी आरोपी दिनेश सिंह (वय ४० वर्षे, धंदा बांधकाम व्यवसाय, रा. मामुर्डी, देहुरोड) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
त्यावरून बावधन पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.











