- हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या पाच जणांना बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. ११ जुलै २०२५) :- हिंजवडीतील साखरे वस्ती परिसरात अवैध गॅस साठा व साहीत्य आढळून आले आहे. विक्री करण्याच्या तयारीत असतानाच खंडणी विरोधी पथकाने तब्बल २०,२५,५०० रू किंमतीचा अवैध गॅस साठा व साहीत्य जप्त केले आहे. पोलिसांनी ही कारवाई (दि. ०९) रोजी दुपारी १२.४० च्या सुमारास केली.
१) धर्मपाल जगदिश बिश्नोई (वय २३ वर्षे रा. हिंजवडी मुळ रा ओशीया ता. फलोदी जि. जोधपूर राजस्थ्यान), २) अशोक बाबुराव सुर्यवंशी (वय ३२ वर्षे, धंदा. चालक रा. पिंपळे सौदागर, मुळ रा. लातूर, ३) अशोक ओमप्रकाश खिलारी (वय २४ वर्षे रा. हिंजवडी, मुळ रा. राजस्थ्यान, ४) बाळु बापु हजारे (वय २५ वर्षे रा. मारुंजी, मुळ रा. अहिल्यानगर, ५) ओमप्रकाश सोहनलाल खिल्लेरी (वय-४५ वर्षे रा. हिंजवडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
विजय रंगनाथ नलगे, पो.हवा ब. नं.१११७ नेमणुक खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीरपणे घरगुती वापराचे अत्यावश्यक सेवेतील गॅस सिलेंडर खरेदी करून जिवनावश्यक वस्तू असलेल्या घरगुती वापराचा गॅस विनापरवाना घरगुती गॅस सिलेंडर मधुन अवैधरित्या कोणतीही खबरदारी न घेता गॅस रिफिलिंग सर्किटच्या सहाय्याने दुसया रिकाम्या कमर्शियल सिलेंडरमध्ये धोकादायकरित्या, कोणतेही सुरक्षेची काळजी न घेता, लोकांच्या जीवीतास धोका निर्माण होईल हे माहीत असून सुध्दा मानवी जिवीतास हानी पोहचविणा-या कोणत्याही संभाव्य धोक्यापासून सुरक्षित राहण्यास पुरेसा इतका बंदोबस्त करणे गरजेचे असताना अतिशिघ्र ज्वालाग्राही पदार्थ असल्याचे माहीती असूनही त्याबाबत पुरेसा बंदोबस्त करणेस जाणीवपूर्वक टाळून, लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल अशी कृती केली. गॅस ट्रान्सफर करुन त्या गॅसच्या भरलेल्या टाक्या चढे दरात स्वतःचे आर्थिक फायदयाकरता, विनापरवाना, अवैधरित्या गॅस टाक्या, व गॅस ट्रान्सफर करण्यास लागणारे साहीत्य व वाहने व ३ वजन काटे असा एकूण २०,२५,५००/- रू किंमतीचा अवैध गॅस साठा व साहीत्य विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगले असताना मिळून आले आहेत.











