न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०१९) :- काही दिवसांपूर्वी, सोशल मीडियावरती युवराज दाखले यांनी भीमा कोरेगाव च्या संदर्भांत कुठलीच भूमिका घेतली नाही, अशी टीका टिप्पणी केली केली होती. याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक असलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक असलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक अज्ञात स्थळी झाली. भीमा कोरेगावच्या जातीय दंगलीमध्ये दोन्ही समाजाना शांत करण्याची भूमिका युवराज दाखले यांनी वेळोवेळी घेतल्याचं आम्ही सर्वांनी पाहिलं आहे. मराठा मुक मोर्चा आंदोलनामध्ये घेतलेली आक्रमक भूमिका सारखीच भूमिका बाकीच्या अठरा पगड जातीसाठी पण घेतली आहे, हे सर्वांना ज्ञात आहे. भीमा कोरेगावच्या प्रकरणात ज्यावेळी सर्व स्वयंघोषित नेते घरात बसून तमाशा पाहत होते, त्यावेळी युवराज दाखले रस्त्यावर उतरून लोकांना शांत करत होते. हे उघड्या डोळ्यांनी सर्व समाजाने बघितले आहे.
आगामी पिंपरी विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात जनतेची व मातंग समाजाची प्रगती वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करीत असल्याचं चित्र सध्या युवराज दाखलेंच्या बाबतीत पहावयास मिळत आहे. युवराज दाखले म्हणजे सर्व समाज बांधवाना एकत्रितपणे आणून त्यांच्याकडून चांगलं काम करून घेणारे नेतृत्व आहे. त्यामुळं ”आमचं अगोदरच ठरलंय पिंपरी विधानसभेत फक्त युवराज दाखलेनाच पाठिंबा द्यायचा”.
या प्रसिद्धीपत्रकावर सुरेश जोगदंड, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सतीश भवाल, सचिव मातंग एकता आंदोलन, रविकिरण घटकार, अखंड बारा बलुतेदार महासंघ प्रदेश कार्याध्यक्षप्रमुख, पदाधिकारी रामकिशन माने, पप्पू परतापे, नितीन गायकवाड, अक्षय थोरात, मसू दोडके, बाळू दगडे, अंकुश सुकले, दीपक दुकले, अमोल तेलंगे, भीम वाळके, दीपक कांबळे आदींच्या सह्या आहेत.















