न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बावधन (दि. १६ जुलै २०२५) :- भूखंड विक्रीच्या नावाखाली बनावट कागदपत्रांद्वारे सुमारे १७ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना लवळे व भुकुम येथे घडली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजीत तुकाराम गवारे (३७, रा. भुकुम, ता. मुळशी) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे. याबाबत महिलेने सोमवारी (दि. १४) बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने स्वतःला रिद्धी-सिद्धी आकाशगंगा सोसायटीचा प्रमोटर आणि बनावट दस्तऐवज दाखवून प्लॉट विक्रीचा सौदा ५७ लाख २० हजार रुपयांमध्ये निश्चित करून १७ लाख ८० हजार रुपये घेतले.
डायरेक्टर असल्याचे सांगितले. बनावट दस्तऐवज दाखवून प्लॉट विक्रीचा सौदा ५७ लाख २० हजार रुपयांमध्ये निश्चित केला. या व्यवहारासाठी संशयिताने वेळोवेळी १७ लाख ८० हजार रुपये घेतले. मात्र, त्यानंतर खरेदीखत करून न देता पैसे स्वतःच्या वापरासाठी वापरले. याप्रकरणी याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.
















