न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०२५) :- डी. वाय. पाटील हॉस्पीटल येथील वॉर्डबॉयवर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी करण्यात आलं आहे…
हा प्रकार (दि. १४) रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पिंपरीतील फुलेनगर जवळ असलेल्या नाल्यासमोर घडला. याप्रकरणी विश्वकुमार गायकवाड (वय २६ वर्ष वॉर्डबॉय) यांनी आरोपी स्वनिल बसवराज माशळकर (रा. फुलेनगर पिंपरी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अटकेत आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, डयुटी संपवुन घरी जात असताना कॉलेजच्या गेट समोर एक इसम हा मोटारसायकल घसरुन पडलेला होता. फिर्यादी व त्याचा मित्र त्याला बघण्यासाठी थांबले असता. फिर्यादी यांच्या ओळखीचा इसम आरोपी याने जुन्या भांडणाच्या कारणावरुन फिर्यादी सोबत तु येथे कशाला आला आहे व माझ्याकडे रागाने का बघतो असे बोलुन फिर्यादी सोबत वाद घालुन फिर्यादी यांना शिवीगाळ करुन त्याच्या कमरेस असलेला चाकु फिर्यादी यांच्या डाव्या पायांच्या माडीवर मारुन फिर्यादी यांना गंभीर जखमी केले आहे.
















