न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
तसेच नेहरुनगर येथील त्यांच्या अर्धाकृती पुतळयासही स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी व नगरसदस्य राहुल भोसले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. आज सकाळी महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत व नेहरुनगर येथे झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्या अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.











