न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आळंदी (दि. १९ जुलै २०२५) :- आळंदीतील इंद्रायणी नदीवरील वैतागेश्वर मंदीरा जवळील नवीन दर्शनबारीच्या स्कॉयवॉक पुलाखाली मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आला.
अनोळखी मयत पुरुष (वय अंदाजे ४० वर्षे) असावे. यास कोणीतरी अज्ञात इसमाने, अज्ञात कारणावरुन, दगड किंवा कोणत्यातरी घातक हत्याराने डोक्यात तसेच तोंडावर मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले आहे, असं फिर्यादीत नमुद आहे.
याप्रकरणी चंद्रकांत खंडू पारधी, वय ३७ वर्षे, पोलीस नाईक १७२४, नेमणुक दिघी पोलिस ठाणे यांनी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिघी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.












