न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२५) :- थेरगाव येथील धनगरबाबा मंदिरासमोरील रस्त्यावर सोमवारी रात्री १०.५० वा. सुमारास सौरभ विकास साठे (वय २२) याने हातात लोखंडी कोयता घेऊन रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना धमकावल्याची घटना घडली आहे.
या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली. पोलीस कॉन्स्टेबल रमेश खेडकर यांनी वेळेवर कारवाई करत आरोपीस ताब्यात घेतले आहे.
आरोपीविरुद्ध काळेवाडी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम १९५९ कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागनाथ सूर्यवंशी करत आहेत.












