न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. २३ जुलै २०२५) :- हिंजवडी येथील भुमकर चौक ऑवरब्रिजवर मध्यरात्री सुमारास झालेल्या अपघातात बालेवाडीतील रहिवासी रंजीत चांडे (वय ३०) हे जखमी झाले. ते आपल्या बुलेट दुचाकी (क्र. एमएच ४२/बीए ८६५३) वरून किवळे येथून बालेवाडीकडे जात होते.
त्यावेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगात व बेदरकारपणे येणाऱ्या अॅक्टिव्हा दुचाकी (क्र. एमएच ०८/एएम ९३२०) ने त्यांच्या दुचाकीस समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत रंजीत चांडे यांच्या उजव्या गालाला मार लागून ते जखमी झाले.
या प्रकरणी रंजीत चांडे यांनी आरोपी दुचाकीस्वार रोहन मनोहर साळवी (वय २६, रा. वाकड) याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता तसेच मोटार वाहन कायदा कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिनय पवार हे करत आहेत.












