- निगडी प्राधिकरणात मध्यरात्री दहशतीचा प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०२५) :- निगडी प्राधिकरण सेक्टर नं. २८ मध्ये दि. २१ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री २.३० वाजता दोन व्यक्तींनी एका घरावर हल्ला करत परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी सुनिल अभिमान घोलप (वय ४५, रा. यमुनानगर, निगडी) यांच्या तक्रारीवरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी कमलेश दत्तात्रय ढवळे (वय २८, रा. तळवडे) आणि त्याचा एक अनोळखी साथीदार यांनी फिर्यादीच्या भावाच्या घरासमोर गेटवर चढून आत येण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिली की, “ये बापू घोलप बाहेर पाठव, नाहीतर मर्डर करीन. मी मोक्यातून बाहेर आलो आहे, मी इथला भाई आहे.”
त्यांनी सिमेंटचे ब्लॉक्स फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अनोळखी आरोपीने कोयत्याने घरावरील बोर्ड व लॅम्प फोडून नुकसान केले. आरोपीने घराच्या गेटवर लघवी केल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३, अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायदा, आणि आर्म अॅक्टसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अटकेत आहेत. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.












