- मृतदेह नदीपात्रात फेकल्याची धक्कादायक घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
ताथवडे (दि. २६ जुलै २०२५) :- ताथवडे येथील एका कंपनीच्या परिसरात खुनाची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी मोहम्मद शादाब शानु खान (वय १९, रा. अंधेरी वेस्ट, मुंबई) यांचे वडील कंपनीत काम करून बाहेर पडले असता, अज्ञात इसमाने त्यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नदीपात्रात फेकून दिला आहे.
ही घटना १७ जुलै २०२५ रोजी रात्री ८.२० वा. ते १९ जुलै दरम्यान घडली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात २५ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने मृत व्यक्तीचा मोटोरोला मोबाईल आणि कार देखील गायब केली आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम १०३(१), २३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत. आरोपी अद्याप अज्ञात असून पुढील तपास सुरू आहे.










