- मारहाण व खंडणी उकळल्याप्रकरणी एकजण अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाल्हेकरवाडी (दि. २६ जुलै २०२५) :- चिंचवड येथील वाल्हेकरवाडी परिसरात एका तरुणाचे जबरदस्तीने अपहरण करून त्याला मारहाण, धमकी, आणि आर्थिक खंडणी उकळल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपी वैभव कांबळे यास अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी पिंटु हिरागर (वय २५, व्यवसाय किराणा दुकानदार) यांना आरोपी वैभव कांबळे आणि अमर अंबाड यांनी १२ ते २५ जुलै २०२५ दरम्यान मारहाण करत पोलिसात तक्रार दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने लंडन ब्रिजखालील नदी किनाऱ्यावर आणि येरवडा येथे नेले.
फिर्यादीच्या मोबाईलमधील खासगी फोटो डिलीट करण्यासाठी आरोपींनी वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने एकूण ५४,५०० रुपये खंडणी उकळली. तसेच ७०,००० रुपये किमतीचा आयफोन-१५ मोबाईल बळजबरीने घेतला आणि पुन्हा ५०,००० रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी भारतीय न्यायसंहितेच्या विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा (क्र. २३५/२०२५) दाखल असून पो.उ.नि. बळीप तपास करत आहेत.











