- १७ वर्षीय युवकाचा मृत्यू, एक जखमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मरकळ (दि. २८ जुलै २०२५) :- मरकळ (ता. खेड) येथे २७ जुलै २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास मरकळ ते आळंदी रस्त्यावर सोमेश्वर मिसळ हॉटेलसमोर भरधाव टाटा ट्रेलरने दोन दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली.
या अपघातात १७ वर्षीय शिवम निलेश काबरा याचा मृत्यू झाला, तर त्याचा चुलत भाऊ आराध्य निलेश काबरा (वय १२) गंभीर जखमी झाला आहे.
फिर्यादी महेश जयनारायण काबरा (वय ५१, रा. मरकळ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच १४ एलबी ७६७७ या क्रमांकाच्या ट्रेलरचा चालक युवराज बाबासाहेब नाकाडे (रा. जालना) याने ट्रेलर भरधाव वेगाने व बेदरकारपणे चालवून अॅक्टिव्हा दुचाकीला जोरदार धडक दिली.
या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१६/२०२५ अन्वये भा.न्या.सं. कलम १०६(1), १२५(A), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खडके करत आहेत.












