- एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर अटकेत; ड्रग्ससह ७ जण ताब्यात
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. 28 जुलै 2025) :- खराडीतील स्टे बर्ड लक्झरी गेस्ट हाऊसमध्ये शनिवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टीवर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे.
पार्टीमध्ये ड्रग्स, दारू, हुक्का आणि महागड्या मद्याचा वापर सुरू असताना पोलिसांनी ५ पुरुष व २ महिलांना ताब्यात घेतले.
<span;>पोलिसांनी २.७ ग्रॅम कोकेन, बिअर बाटल्या, मोबाईल, हुक्का साहित्य आणि इतर साहित्य जप्त केले.
अटकेतील आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले असून, खेवलकर यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे.
प्रांजल खेवलकर हे रिअल इस्टेट आणि इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात कार्यरत असून त्यांचे पुण्यात वारंवार येणे-जाणे असते. यापूर्वीही त्यांच्या नावाशी वाद जोडले गेले होते. यामुळे खडसे कुटुंबीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
प्रकरणातील आणखी व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचा तपास सुरू असून, एनडीपीएस कायद्यानुसार कठोर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात भूकंपसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.














