न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. २८ जुलै २०२५) :- शिवसेना काळेवाडी विभागाच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक व आरोग्य सेविका सन्मान तसेच दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख व माजी आमदार गौतम चाबुकस्वार, उपजिल्हा प्रमुख दस्तगीर मणियार, संवाद व्यासपीठाचे हरीश आप्पा मोरे, सुरेश विटकर, वुमन राईट्सच्या अध्यक्षा अनिता वर्मा, जिल्हा समन्वयक सुशीलाताई पवार, पिंपरी चिंचवड शहर संघटिका रूपालीताई, उपजिल्हा प्रमुख वैभवीताई घोडके, सौ. पुष्पा सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अलवी सय्यद, डॉ. पियुषा कडुस, डॉ. अभिजीत शेखर, डॉ. प्रकाश जाधव, मुख्याध्यापिका सविता जाधव, रितू पसरीचा, शोभा घावटे, विजयश्री काजळे, प्राचार्य गीता जोशी, वैभवी खरात, प्रकाश तांबोरे, वैष्णव जाधव, विजय पट्टर, संजय गायके, राज नखाते, आशा सेविका जया चासकर यांचा सन्मान करण्यात आला.
दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थी तसेच क्रीडा क्षेत्रातील अनुष्का येळवे, सृष्टी पवार, श्रेया आलूर, सार्थक आहेर या खेळाडूंना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात माजी आमदार गौतम चाबुकस्वार, हरीश आप्पा मोरे, सुजाताताई नखाते, प्राचार्य गीता जोशी, वैभवी खरात यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास जय हरी ग्रुप, शिवसेना महिला आघाडी, युवा सेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, पालक, विद्यार्थी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन विभागप्रमुख गोरख पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन विधानसभा प्रमुख हरेश आबा नखाते यांनी केले.











