- महिला व्यावसायिक आईची पोलीसात धाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
गहुंजे (दि. ३० जुलै २०२५) :- लोढा बेलमेडो सोसायटीमधील क्लब हाऊसमध्ये पार्टी दरम्यान एका व्यावसायिक महिलेच्या मुलास गळा दाबून मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या प्रकरणी किशोर छबुराव भेगडे (रा. व्हिला नं. ०१, लोढा बेलमेडो, गहुंजे) याच्यावर शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
ही घटना दि. २८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता क्लब हाऊसमध्ये घडली. फिर्यादी महिला (वय ४५, व्यवसाय – व्यापार, रा. व्हॅस्कॉन पॅराडाइस, बाणेर रोड, पुणे) यांच्या दोन्ही मुलांनी त्यांचे वर्गमित्र-मैत्रिणींसह पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत आदित्य भेगडे यास सहभागी होण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून त्याचे वडील किशोर भेगडे यांनी क्लब हाऊसमध्ये येऊन फिर्यादीच्या मुलांना जबरदस्ती अडवले.
यावेळी आरोपीने फिर्यादींचा मुलगा लक्ष यास गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. “मी कोण आहे तुला माहीत नाही, तुझ्या बापाला बोलाव, तुला आज जिवंत ठेवत नाही,” असे म्हणत आरोपीने त्याच्या छातीवर व पोटावर हाताबुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. त्यामुळे लक्ष यास गंभीर दुखापत झाली आहे.
या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक केंद्रे तपास करत आहेत.












