- भूखंड गहाण ठेवून कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने ४३ लाखांची फसवणूक….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२५) :- धानोरी येथील भूखंड गहाण ठेवून कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने एका टुर्स अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिकाची तब्बल ४३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पवन मिसाळ (वय ५३, रा. धानोरी) यांनी २०२२ मध्ये कर्जासाठी प्रयत्न सुरू केले होते. यावेळी आरोपी क्रमांक १ जग्गुजी तनवाणी (अशोक नागरी सहकारी बँकेचे असिस्टंट मॅनेजर), आरोपी क्रमांक २ प्रकाश कुंभार (कॅशियर), व आरोपी क्रमांक ३ शाम सिंग (फिर्यादीचा मित्र) यांनी मिळून फिर्यादीला केवळ ३ गुंठ्याचा भूखंड गहाण ठेवायचा सांगून संपूर्ण ६ गुंठ्याचा प्लॉट बँकेत गहाण घेतला.
तसेच आरोपी क्रमांक २ ने चेक क्रमांक वापरून वेगवेगळ्या नावांनी प्रोसेसिंग फी, सभासद फी, मूल्यांकन फी याच्या नावाखाली फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. ही रक्कम इंटरप्रायझेस, सेल्फ व आरोपी क्र. ३ यांच्या नावे वळती करून स्वतःच्या फायद्यासाठी वापरली.
या प्रकरणी भा.दं.सं. कलम अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक उबाळे तपास करीत आहेत.












