- ‘पीएमआरडीए’ला सिंगल पॉईंट को-ऑर्डिनेटरची जबाबदारी…
- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२५) :- पिंपरी-चिंचवड, हिंजवडी आयटी पार्क, चाकण-तळेगाव औद्योगिक पट्टा आणि ग्रामीण पुणे परिसरातील तीव्र वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (PMRDA) यांना आता ‘सिंगल पॉईंट को-ऑर्डिनेटर’ म्हणून जबाबदारी देण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ही बैठक भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध शासकीय यंत्रणा, औद्योगिक संघटना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या निर्णयामुळे आयटी आणि औद्योगिक वसाहतींच्या जोडणाऱ्या मार्गांची कार्यक्षम सुधारणा अपेक्षित असून, एकात्म समन्वयामुळे भांडणाविना निर्णयप्रक्रियेला गती मिळणार आहे.
बैठकीतील ठळक निर्णय व कार्यवाही..
1. PMRDA ला समन्वयक म्हणून अधिकृत जबाबदारी.
2. भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून निधी मागणी व पाठपुरावा.
3. नाशिक फाटा – चाकण 8-लेन महामार्ग प्रकल्पाला गती.
4. तळेगाव-चाकण-शिक्रापूर DP रस्ता ३० मीटर रुंदी.
5. NHAI कडून अतिरिक्त रुंदीकरणाचे प्रस्ताव.
6. २०५ भूमिपुत्रांचे तात्काळ भूसंपादन व मोबदला.
7. चाकण चौकामधील इलेक्ट्रिकल टोल शिफ्टिंग सुरू.
8. आंबेठाण चौकात ३० दिवसांत पोल शिफ्टिंग पूर्ण.
9. तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याचा ४-लेन प्रस्ताव.
10. ८ दिवसांत खड्डे भराईचे काम सुरू.
11. मोई-निघोजे ४५ मीटर रुंदी रस्ता लवकरच सुरू.
12. मोई-चिखली रोड रुंदीकरण व पूल बांधणीचा प्रस्ताव.
13. मोशी चौक, आळंदी चौक, गणेश साम्राज्य चौक, आळंदी फाटा चौक, स्पायसर चौक, येळवडी या महत्त्वाच्या चौकच्या विस्तारीकरणाची चाकण असोसिएशनची मागणी.
14. रस्त्यावर थांबणाऱ्या ट्रक्सवर कठोर कारवाई.
15. चुकीच्या पार्किंगवर कारवाईचे आदेश.
16. HPCL चौकातील टँकर्ससाठी वाहतूक निर्बंध.
17. गायरान जमीन MIDC कडे ट्रक टर्मिनससाठी हस्तांतरित.
18. हिंजवडी व चाकणसाठी स्वतंत्र समन्वय समित्या स्थापन.
19. ‘सारथी’सारखी मोबाईल अॅप यंत्रणा पुणे जिल्ह्यासाठी.
20. आळंदी नगरपालिका हद्दीबाहेरील चऱ्होली – आळंदी रोडसाठी २ किमीचा १८ मीटर रुंदीचा बाह्यवळण रस्ता आणि इंद्रायणी नदीवरील १२ मीटर पुलाची PMRDA मार्फत मागणी.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून हिंजवडी आयटी पार्क, चाकण औद्योगिक क्षेत्र आणि पुणे-पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागाची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार झाला आहे. येत्या काळात वाहतूक कोंडीमुक्त व समस्यामुक्त पुणे परिसर निश्चितपणे साकार होईल, असा विश्वास वाटतो.”
आ. महेश लांडगे…

















