न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ३१ जुलै २०२५) :- “ऑल सीनियर सिटीझन असोसिएशन”ची वार्षिक सभा आज बासुरी बॅंक्वेट हॉल, पिंपळे सौदागर येथे स्नेहपूर्ण वातावरणात पार पडली. भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सभेत वर्षभरातील आरोग्य, सामाजिक उपक्रम, आणि वरिष्ठ नागरिकांच्या योगदानाचा आढावा घेण्यात आला. शत्रुघ्न काटे यांनी आपल्या भाषणात वरिष्ठ नागरिकांचा अनुभव समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात संजय भिसे, कुंदाताई भिसे, जगन्नाथ काटे, निर्मलाताई कुटे, वृषाली मरळ, ईश्वरलाल चौधरी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. समारोपानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.












