- आमदार अमित गोरखेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ०४ ऑगस्ट २०२५) :- साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट हा दिवस ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून घोषित करावा, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
पुण्यात अलीकडेच झालेल्या खंड प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.
अमित गोरखेंनी सांगितले की, “अण्णाभाऊंचे साहित्य केवळ शब्द नव्हते, ते होते अन्यायाविरोधातील हुंकार आणि सामाजिक परिवर्तनाची मशाल.” त्यांनी ३५ हून अधिक कादंबऱ्या, १५० हून अधिक ललित साहित्य प्रकार, हजारो पोवाडे, लोकनाट्ये आणि गीते लिहिली. विशेषतः ‘फकिरा’ ही कादंबरी क्रांतीकारी ठरली.
गोरखेंनी अधोरेखित केले की अण्णाभाऊंचे लेखन दलित, श्रमिक, कामगार, तमाशा कलावंत आदी वंचित समाजाशी थेट जोडलेले होते. नव्या पिढीला त्यांच्या लेखनातून प्रेरणा मिळावी, यासाठी हा दिवस ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. अण्णाभाऊंची लेखणी ही सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी अस्त्र असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.












