- खूनाचा प्रयत्न करणारा अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
थेरगाव (दि. ०४ ऑगस्ट २०२५) :- थेरगाव येथील नखातेनगर परिसरात किरकोळ वादातून एका तरुणावर भाजी कापण्याच्या चाकूने प्राणघातक हल्ला करून खूनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याप्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
गुन्हा दाखल झालेला आरोपी सेलवराज अंहंडी थेवर (वय ५१) हा नखातेनगर, थेरगाव येथे वास्तव्यास आहे. तर फिर्यादी दिलीप हुलराम सूर्यवंशी (वय २४) हेही त्याच ठिकाणी वास्तव्यास आहेत.
ही घटना २ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता घडली. फिर्यादी व आरोपी रूममध्ये एकत्र गप्पा मारत बसले असताना, फिर्यादी मुरगम्मा नावाच्या महिलेशी बोलत असल्यामुळे आरोपी सेलवराजला राग आला. संतापाच्या भरात त्याने “मुरगम्मा के साथ बात क्यूं किया, मैं तुमको अभी जिंदा नहीं छोडूंगा” असे म्हणत फिर्यादीशी वाद घातला, शिवीगाळ केली व अचानक भाजी कापण्याच्या चाकूने फिर्यादीच्या डोक्यावर, डाव्या हातावर व उजव्या पायाच्या पोटरीवर वार केले.
या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फिर्यादीच्या तक्रारीवरून काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिमंडळ पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.












