न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. ०४ ऑगस्ट २०२५) :- रहाटणी परिसरात रस्त्यावर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुरडीला भरधाव वेगात आलेल्या कारची धडक बसून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी सध्या फरार आहे.
मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव सुकन्या शिवराज देवरे (वय २ वर्षे) असून, ती रहाटणी येथील शिवराजनगर कॉलनी येथे आपल्या कुटुंबासोबत राहत होती.
ही घटना २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.१५ ते ६.४५ दरम्यान घडली. फिर्यादी शिवराज जळबा देवरे (वय २४, व्यवसाय – बिगारी कामगार) हे त्यांच्या घरी असताना त्यांची मुलगी सुकन्या घरासमोर रस्त्यावर खेळत होती.
यावेळी जय योगेशकुमार लाठीवाला, रा. साई मिरॅकल सोसायटी, रहाटणी, याने आपल्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची कार निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवून सुकन्याला जोरदार धडक दिली. या अपघातात सुकन्या गंभीर जखमी झाली असून, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिमंडळ पोलीस उपनिरीक्षक मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, आरोपी अद्याप अटकेत नाही.












