न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मनपा प्रशासकीय इमारतीत सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, आरोग्य वैदयकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी मारुती शिंदे, चारुशिला जोशी आदी उपस्थित होते.














