न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १७ ऑगस्ट २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहरात उन्नती सोशल फाउंडेशन व उन्नती सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकडून फोडली जाणारी उन्न‘ती’ ची दहीहंडी प्रथमच मोठ्या उत्साहात पार पडली. या सोहळ्याआधी कृष्णजन्माष्टमी उत्सव साजरा करून श्रीकृष्णाला ५६ भोगांचा प्रसाद अर्पण करण्यात आला.
पारंपरिकरित्या पुरुषांकडून फोडली जाणारी दहीहंडी महिलांनी फोडून सामाजिक परिवर्तनाचा अनोखा संदेश दिला. छोट्या मुलीच्या हस्ते उन्न‘ती’ ची दहीहंडी फोडण्यात आली. या उपक्रमामागील संकल्पना स्पष्ट करताना उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे म्हणाल्या, “उन्नती सखी मंचच्या महिला सदस्यांनी घेतलेला हा उपक्रम खरोखरच ऐतिहासिक आहे. महिलांनी एकजुटीने पुढाकार घेतला तर समाजातील कोणतीही परंपरा नव्या दृष्टीकोनातून साकारता येते, याचे हे उदाहरण आहे.”
या ऐतिहासिक सोहळ्याला संस्थापक संजय तात्याबा भिसे, आनंद क्लब, ऑल सीनियर सिटीजन असोसिएशन, विठाई वाचनालय, उन्नती सखी मंचच्या सदस्य व फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन उपाध्यक्षा डॉ. रश्मी मोरे यांनी केले.










