न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२५) :- प्राधिकरण येथील गरवी गुजराती समाजाच्या वतीने ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या वेळी ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते अण्णा अभंग यांच्या हस्ते झाले.
तसेच मौलाना आझाद स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित कार्यक्रमात माजी महापौर आर.एस. कुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.
या सोहळ्यांना अध्यक्ष मुकेश चुडासमा, मौलाना खलील शेख, माजी उपमहापौर शैलजा मोरे, विजय शिनकर, किर्ती शहा, जिग्नेश पटेल, मेहमूद सय्यद, प्रवीण वाढीया, विनय पगारे, जायची खान आदी मान्यवर उपस्थित होते. अनेकांनी मनोगत व्यक्त करून स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व अधोरेखित केले.










