न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवडगाव (दि. १८ ऑगस्ट २०२५) :- चिंचवडगाव येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवीन पाच मजली तालेरा रुग्णालय उभारण्यात आले आहे. मात्र या रुग्णालयाचा नावाचा फलक पाचव्या मजल्यावर लावलेला असल्याने नागरिकांना तो दिसत नव्हता.
त्यामुळे रुग्णालयाचे ठिकाण समजण्यात अनेकांना अडचणी येत होत्या. ही बाब जागृत नागरिक किशोर जैन यांनी निदर्शनास आणून दिली.
त्यानंतर जागृत नागरिक महासंघाने रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनेकर यांच्याशी चर्चा केली. त्यांनी नागरिकांची अडचण मान्य करून तात्काळ उपाययोजना केली. परिणामी रुग्णालयाचा नवीन फलक अगदी सहज नजरेला दिसेल अशा ठिकाणी लावण्यात आला आहे. ही माहिती जागृत नागरिक महासंघाचे नितीन यादव यांनी दिली आहे.










