- या भागातील नागरिकांना पाणी मिळणार नाही.
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० ऑगस्ट २०२५) :- चिखली जलशुद्धीकरण केंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या भोसरी आर.एस. उपकेंद्रावर गुरुवार, दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत तातडीची दुरुस्ती व देखभाल कामे होणार आहेत. त्यामुळे या काळात केंद्राचा वीजपुरवठा खंडित राहणार असून पाणीपुरवठा बंद राहील.
बोऱ्हाडेवाडी, इंद्रायणीनगर (सेक्टर ४, ६, ९, ११, १२), शिवरस्ता, चक्रपाणी वसाहत, धावडेवस्ती, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव, चोवीसावाडी आणि परिसरातील नागरिकांना गुरुवारी पाणी मिळणार नाही.
तसेच शुक्रवार, दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.
महापालिका प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.












