न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०१९) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी – मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वी बोर्डाच्या परीक्षेचा राज्याचा निकाल मंगळवारी (दि. २८) रोजी जाहीर झाला. पिंपरी चिंचवड शहराचा निकाल ८९.०९ टक्के लागला आहे. शहराचा गेल्या वर्षी ८०. ४६ टक्के इतका निकाला लागला होता. यंदा जवळपास दहा टक्क्यांनी निकालाचा टक्का वाढला आहे.
शहरातील ८० महाविद्यालयांपैकी १६ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्या पुढीलप्रमाणे :-
पोदार इंटरनॅशनल स्कूल, एसएनबीपी कॉलेज चिखली, क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल आणि ज्यु. कॉलेज आकुर्डी, एसएनबीपी कॉलेज रहाटणी, सुरेश मोरे उच्च माध्यमिक विद्यालय रावेत, हॉरिझॉन ज्युनिअर कॉलेज दिघी, सरस्वती विश्व विद्यालय ज्यु. कॉलेज, कै. ब. पी. बी. जोग हायस्कूल, अभिषेक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एसएनबीपी ज्यु. कॉलेज मोरवाडी, संचेती ज्यु. कॉलेज थेरगाव, निर्मल बेथानी काळेवाडी, अमृता ज्यु. कॉलेज यमुनानगर, मॉर्डन ज्यु. कॉलेज निगडी, श्रीमती संजूबेन. एस. अजमेरी पिंपरी, श्री स्वामी समर्थ ज्यु. कॉलेज.











