न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२५) :- गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार अमित गोरखे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. गणपतीचे दर्शन घेऊन बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर गोरखे कुटुंबीयांनी त्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत केले.
या भेटीदरम्यान मंत्री पाटील यांनी गोरखे कुटुंबीयांशी संवाद साधला तसेच शहरातील विकासकामे आणि शैक्षणिक उपक्रमांवर अनौपचारिक चर्चा केली.
नगरसेविका अनुराधा गोरखे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, वैशाली खाडे, बापूशेठ घोलप, कमल घोलप, सुप्रिया चांदगुडे, मनीषा शिंदे, गणेश लंगोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. अमोल गोरखे यांनी सर्वांचे स्वागत केले.
या भेटीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, मतदारसंघाच्या विकासासाठी ही भेट नवी दिशा देणारी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.










