न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर २०२५) :- महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापु) काटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान दादांनी शहरातील राजकीय, सामाजिक तसेच विकासाच्या मुद्द्यांवर संवाद साधला.
विशेष म्हणजे, त्यांनी भक्तिभावाने बाप्पांची आरती करून आशीर्वाद घेतला. तसेच नवनिर्वाचित भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्यांशी चर्चा करून पक्ष संघटन मजबूत करण्याचे, जनसंपर्क वाढवण्याचे आणि विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे मार्गदर्शन केले.
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी चंद्रकांतदादांचे स्वागत करून शहरातील विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी दादांनी काटे यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी खासदार अमर साबळे, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, माजी महापौर उषा ढोरे, संघटन पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा कार्यकारिणी सदस्य तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










