न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. ४ सप्टेंबर २०२५) :- रुपीनगर, चिखली येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी परस्पर तक्रारींवरून पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना मंगळवारी रात्री वंदे मातरम चौक परिसरात घडली.
पहिल्या घटनेत फिर्यादी कुणाल पाटील (रा. रुपीनगर, तळवडे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, श्रीमंत तिरंगा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दक्षता तरुण मंडळाच्या मिरवणुकीत अडथळा आणत शिवीगाळ, धक्काबुक्की केली. यावेळी जनरेटर लावलेल्या टेम्पोचे काच व मडगार्ड फोडून नुकसान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी राहुल पवार, रोहन पाटील, अनुज देशमुख, करण फिरके, योगेश गुजर, महेश कदम, नितीन चौधरी व राहुल जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
तर दुसऱ्या घटनेत फिर्यादी राहुल पवार (रा. रुपीनगर, तळवडे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गणेश विसर्जन मिरवणुकीत अक्षय गरुड, मिलिंद काजळे, तन्मय कदम, कुणाल पाटील, तुषार काजळे, संतोष डावरे, सुनिल शर्मा, तुषार कुकरेजा, गोकुळ कदम, विनोद इंगळे, शुभम सदानंद व केतन पाटील यांनी त्यांच्यावर हल्ला केला. शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे नमूद आहे.
दोन्ही घटनांवर चिखली पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सपोनि मोटे करत आहेत.
















