न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०१९) :- पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या कार्यालयात त्यांची भेट धेऊन, सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या. आपल्या मागण्या देखील त्यांच्या समोर मांडल्या.
यावेळी औद्योगिक परिसरातील वीज, मुलभूत सुविधा, रेड झोन, सरकारी अस्थापानाकडून लघु उद्योगांना काम मिळणे, लघुउद्योगाना चालना, उद्योगासंबंधित केंद्र सरकारची कार्यालये पिंपरी चिंचवड शहरात उघडण्यात यावीत. या सर्व समस्या सुटतील अशी आशा उद्योजकांनी व्यक्त केली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, खजिनदार संजय ववले, संचालक प्रमोद राणे, योगेश बाबर, संपत मापारी, राजू जगदाळे, गुरुचरण सिंघ संधू, रोहित कदम, महाडिक, चांगदेव कोलते, वैद्य हुकूमचंद उपस्थित होते.












