न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सांस्कृतिक आणि कला धोरणांतर्गंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या महोत्सवाच्यावेळी अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या आशा धायगुडे – शेंडगे, अनुराधा गोरखे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, उपअभियंता शिवाजी चौरे, व मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.
यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. रांगोळी स्पर्धेमध्ये मोठया संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये तृत्तीय क्रमांकाच्या मानकरी अनिता परदेशी व्दीतीय क्रमांकासाठी वर्षा चराठे व प्रथम क्रमांकाच्या मानकरी स्वाती पाटील ठरल्या. मेहंदी स्पर्धेमध्ये मोठया संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला असून तृत्तीय क्रमांकाच्या मानकरी लक्ष्मी कोकाटे व्दीतीय क्रमांकासाठी प्रियंका जुजकर व प्रथम क्रमांकाच्या मानकरी आदिती जगताप ठरल्या.
वेशभूषा स्पर्धेमध्ये मोठया संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला असून तृत्तीय क्रमांकाच्या मानकरी हर्षा कटारीया व्दीतीय क्रमांकासाठी सुमेघा देवचक्के व प्रथम क्रमांकाच्या मानकरी वर्षा सराटे ठरल्या. पाककला (तिखट) स्पर्धेमध्ये मोठया संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला असून तृत्तीय क्रमांकाच्या मंजीरी जवळीकर व्दीतीय क्रमांकासाठ त्र५तू गुप्ता व प्रथम वैजयंती हिंगे क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.
पाककला (गोड) स्पर्धेमध्ये मोठया संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला असून तृत्तीय क्रमांकाच्या मालती कोष्टी व्दीतीय क्रमांकासाठ मीना मांडके व प्रथम ऋतू क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. स्पर्धेमध्ये परिक्षक म्हणून स्वाती देशपांडे, सतिश वर्तक, माधुरी सासवडे, प्राजक्ता निफाडकर, उत्कर्षा कुलकर्णी, अरुंधती कामत यांनी कामकाज पाहिले.
दि. ३१ मे २०१९ रोजी अहिल्यादेवी होळकर महिला व सांस्कृतिक महोत्सवा अंतर्गंत शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी – ९.०० वा. – गजीनृत्य (सांगली जिल्हयातील कलाकार) सांगवी येथील पुतळया जवळ सकाळी – ९.३० वा. – गजीनृत्य (मुंबई येथील कलाकार) पिंपरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळया जवळ सकाळी – १०.०० वा. सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण सकाळी – १०.३० वा. पिंपरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण सकाळी १०.३५ वा. – महिला महोत्सव २०१९ पारितोषक वितरण सोहळा या कार्यक्रमाचे उदघाटन मा.आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते संपन्न होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.महापौर राहूल जाधव असणार आहेत.












