- ३८ हजार चौ. फूट क्षेत्र अतिक्रमणमुक्त; रस्ता रुंदीकरणाला गती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने वाकड-ताथवडे परिसरात मोठी अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली. विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या १८ मीटर रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या झोपडपट्टीवरील कारवाईत ४३ झोपड्या हटवून सुमारे ३८ हजार ७५० चौ. फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले.
काळाखडक येथील सर्वे नं. १२४/१ या जागेवरील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस लागून भूमकर चौक ते ताथवडे हद्दपर्यंतच्या सुमारे २०० मीटर लांबीच्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. रुंदीकरणासाठी बाधित झालेल्या झोपड्या/अनधिकृत वीट बांधकाम हटवण्यासाठी ४ पोकलेन, ४ जेसीबी, ६ डंपर आणि २० मजुरांची मदत घेण्यात आली.
या मोहिमेत झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, अतिक्रमण विभाग, शहरी दळणवळण विभाग, नगररचना विभाग, अग्निशामक दल आणि महाराष्ट्र सुरक्षा बल यांचा सहभाग होता. कारवाई आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
“महापालिकेच्या विकास योजना आणि सार्वजनिक सुविधांच्या अंमलबजावणीस अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. वाकड-ताथवडे परिसरात अतिक्रमण हटवले असून रस्त्याचे काम त्वरित सुरू होईल. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.”
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड…













