न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०१९) :- नरेंद्र माेदी यांच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी साेहळा राष्ट्रपतीभवन येथे पार पडला. भाजप पुन्हा सत्तेत आल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
नरेंद्र माेदी यांनी आज पुन्हा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पुण्यातील नमाे अमृततुल्यकडून पुणेकरांना माेफत चहा वाटण्यात आला. संध्याकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत हा माेफत चहा देण्यात आला. यावेळी शेकडाे पुणेकरांनी चहाचा लाभ घेतला.











