न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०१९) :- महिंद्रा सीआयई लिमिटेड फोर्जिंग डिव्हीजन, चाकणतर्फ स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पिंपरी चिंचवड येथील वल्लभनगर एसटी स्थानकात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी नगरसेविका सुजाता पालांडे, कंपनीचे कार्यकारी संचालक रमेश कौल, सुनील नरके (ऑपरेशन हेड) व अनिल काला यांच्या नेतृत्वाखाली वल्लभनगर आगारातील परिसरात हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात रमेश रहिंज, विनोद पाटील, तात्यासाहेब मलगोंडे, योगेश चिखले, सोमनाथ मुसळे, संजय मानकर, एकनाथ मोरे, छत्रपती इंगोले, बाबासाहेब पाटील, कल्याण सकते, संतोष नरळे, अशोक शिद्रुक, गणेश वरनाळे, संजय रसाळ, तळवार, संतोष महाळुनकर, राजू बिराजदार, अक्षय हाळकुंटे आदींनी सहभाग घेतला.
यावेळी वल्लभनगर आगारात तब्बल दोन पोती दारूच्या बाटल्या आढळून आल्याने हे आगार दारूचा अड़ा बनला आहे की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.











