न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. १७ सप्टेंबर २०२५) :- ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याची तयारी करणाऱ्या कुख्यात रावण टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने सापळा रचून जेरबंद केले आहे. या कारवाईत ६ सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे, तलवारी, लोखंडी रॉड व गुन्ह्यात वापरण्यात येणारी कार जप्त करण्यात आली आहे.
(दि. १६) रोजी रात्री उशिरा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे खेड-आळंदी रोड परिसरातील इंद्रायणीनगर येथील रिकाम्या जागेवर छापा टाकण्यात आला. या छाप्यात १) अनिरुद्ध उर्फ बाळ्या उर्फ विकी राजु जाधव (रा. रावत, पुणे), २) अभिषेक उर्फ बकासुर चिमाजी पवार (रा. तळेगाव, पुणे), ३) यश उर्फ गोंदा आकाश खंडाळे (रा. पीसीएमसी परिसर), ४) शुभम गोरेसत्ता चव्हाण (रा. निगडी), ५) प्रधुम्न राजकुमार जाधव (रा. खेड, जिल्हा पुणे),
६) सोहन राजु चंदेलिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पैकी अनिरुद्ध जाधव याच्याकडे यापूर्वी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, सराईत गुन्हेगार म्हणून त्याची नोंद पोलीस अभिलेखात आहे.
या कारवाईत आरोपींकडून पिस्तूल, ०१ जिवंत काडतूस, तलवारी, लोखंडी हत्यारे, बॅग व एकूण १५,१५,४०८ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस आयुक्त विनायककुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त एस.बी. आवाड, मा. पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. ए.सी. माने, स्टाफ व गुंडा विरोधी पथकाने केली.