न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी : कचरागाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकरीता अचानक संप पुकारल्यामुळे शहरात जागोजागी कचऱ्यांचे ढीग जमा झालेले आहेत. त्यामुळे शहरातील प्रत्येक प्रभागात कचरा न उचलल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत.
यावेळी स्वपुढाकार घेऊन नगरसेविका अनुराधा गोफणे यांनी जयहिंद काॅलनी, शास्त्री चौक, जय महाराष्ट्र चौक, महादेव नगर तसेच प्रभागात इतर ठिकाणी अस्ताव्यस्त पडलेला कचरा गोळा करून त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली.
प्रभागातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते देविदास गोफणे आदींनी याकामी मदत केल्याचे नगरसेविका अनुराधा गोफणे यांनी सांगितले.