- पोलिसांकडून कोयते, दुचाक्या व मोबाईलसह मुद्देमाल जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सांगवी, (दि. २५ सप्टेंबर २०२५) :- सांगवी परिसरात दरोड्याची तयारी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी मध्यरात्रीच्या सापळ्यात पकडले. या कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून कोयते, मिरची पावडर, मोबाईल फोन आणि पाच दुचाक्या असा एकूण २ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
२५ सप्टेंबर रोजी पहाटे १२.३० वाजता जुनी सांगवी येथे पोलिसांनी ही कारवाई केली. अटक आरोपींमध्ये संतोष पवार, पियुष राजपुत, तेजस हंसकर, आलोक खेत्रे, अमोल भोसले आणि विराज काटे यांचा समावेश आहे. तर गुड्डू उर्फ आर्यन मोरे आणि शायद शेख हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी छापा टाकला. आरोपींकडून होंडा शाइन, एसपी-१२५, स्प्लेंडर व मोपेड दुचाक्या, लोखंडी कोयते आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
या प्रकरणी भा.दं.वि. कलम, भारतीय हत्यार कायदा कलम) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि कलकुटगे करीत आहेत.












