न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळुस (ता. खेड), (दि. २५ सप्टेंबर २०२५) :- खेड तालुक्यातील काळुस येथील ३३ वर्षीय तरुणाची इंडियन ऑईल कंपनीच्या नावाने पेट्रोल पंप डीलरशीप देण्याचे आमिष दाखवून तब्बल २९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आयटी अॅक्टसह भा.दं.वि. कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
एप्रिल ते मे २०२५ दरम्यान पीडिताला इंडियन ऑईल कंपनीच्या बनावट ई-मेल आयडीवरून पेट्रोल पंप डीलरशीपसाठी अर्ज व LOI (Letter of Intent) फॉर्म पाठवण्यात आला. त्यानुसार पीडिताने ऑनलाइन फॉर्म भरून ८,८६,९८३ रुपये जमा केले. यानंतर स्वतःला इंडियन ऑईल कंपनीचा सेल्स मॅनेजर म्हणून ओळख करून देणाऱ्या प्रभाकर सिंग या व्यक्तीने फोनद्वारे माहिती देत आणखी २० लाख रुपये डिपॉझिट म्हणून मागवले. तथापि प्रत्यक्षात कोणतीही डीलरशीप न देता पीडिताची मोठ्या रकमेची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास वपोनि सोळंके करीत आहेत.












