न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहरातील सायबर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने एका महिलेच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट उघडून तिचे अश्लील फोटो तयार केले. त्यावरून अश्लील मेसेज पाठवणे, फोटो प्रसारित करण्याची धमकी देणे असे प्रकार आरोपीने केले. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार चिखली पोलीस ठाणे हद्दीत परिसरात राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीसोबत घडला. आरोपीचे नाव सुदर्शन सुनील जाधव (२५ वर्षे, रा. मेदनकरवाडी, आळंदी फाटा, चाकण, पुणे) असे आहे. त्याने एआय अॅप्लिकेशनचा वापर करून महिला व्यक्तीचे अश्लील फोटो व मेसेज तयार करून ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली.
सायबर पोलिसांनी तपास करताना आरोपीचा मोबाईल नंबर शोधून त्याला ताब्यात घेतले. आरोपीकडून वापरलेले तंत्रज्ञान, अॅप्लिकेशन्स व इतर माहिती पोलिसांच्या ताब्यात आली आहे. या प्रकरणात महिलेला त्रास देण्याच्या उद्देशाने अश्लील फोटो तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. डॉ. शशिकांत महावरकर (सह आयुक्त गुन्हे), संजय आहेर (उपायुक्त गुन्हे), डॉ. शिवाजी पवार (सहाय्यक आयुक्त गुन्हे) तसेच विशाल हिरे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक), रविकिरण नाळे (निरीक्षक), सपोनि प्रभाकर स्वामी, प्रणव शेळकंदे, प्रकाश कातकडे आदींच्या पथकाने केली.












