न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२५) :- महानगरपालिका सेवेत वर्षानुवर्षे उत्तमरित्या सेवा करून सेवानिवृत्त होणारे आपल्या सहकारी अधिकारी,कर्मचारी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत
आपल्या कार्याचा प्रत्यय दिला आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सह आयुक्त मनोज लोणकर यांनी केले आणि सेवानिवृत्त होणा-या अधिकारी,कर्मचा-यांना पुढील वाटचालीसाठी आरोग्यदायी शुभेच्छाही दिल्या.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत मधुकर पवळे सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात माहे सप्टेंबर २०२५ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या १२ तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या १० अशा एकूण २२ कर्मचाऱ्यांचा सह आयुक्त मनोज लोणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या कार्यक्रमास उप आयुक्त संदीप खोत,मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,कर्मचारी महासंघाच्या उपाध्यक्षा सुप्रिया सुरगुडे तसेच महापालिका कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
माहे सप्टेंबर २०२५ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचाऱ्यांमध्ये स्थापत्य उप अभियंता राजेंद्र डुंबरे, असिस्टंट मेट्रन नंदिनी कदम, मध्यवर्ती औषध भांडार विभागाचे व्यवस्थापक मोहम्मद अब्दुल अब्बास, कार्यालय अधिक्षक सुभाष कुंभार, अंबर चिंचवडे, फार्मासिस्ट सुनील नाथे, उप शिक्षक शांता वायाळ, नयना रत्नपारखी, वायरलेस ऑपरेटर उषा कदम, इलेक्ट्रीक मोटार पंप ऑपरेटर लक्ष्मण लोखंडे, मुकादम कविता गोहेर, मजूर चंद्रकांत साठे यांचा समावेश आहे.
तर स्वेछानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मुख्य लिपिक दत्तात्रय सातव, सफाई कामगार अलका काळे, चंदा शरद, सफाई सेवक कैलास बाराथे, दांडग्या भोसले, सफाई कामगार सुनिता भोसले, जयसिंग नढे, नंदू घुले, कचरा कुली नवनाथ जाधव, गटर कुली सुनिल जावळे यांचा समावेश आहे.












