न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. 3 ऑक्टोबर 2025) :- चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट अंतर्गत असलेल्या प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयात बी.एड. विद्यार्थ्यांसाठी भोंडला व दांडियाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम यांच्या हस्ते गजलक्ष्मी प्रतिमेची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक भोंडल्याची गाणी गात फेर धरला गेला. संगीताच्या तालावर व विविध गाण्यांच्या सुरावटींवर विद्यार्थ्यांनी दांडिया खेळत आनंद लुटला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना खिरापत वाटण्यात आली.
प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम यांनी या प्रसंगी सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच संस्था सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा व संचालिका डॉ. तेजल शहा यांच्या मार्गदर्शन व सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. पल्लवी चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गीता कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सुवर्णा गायकवाड यांनी मानले.
पारंपरिक व सांस्कृतिक रंगात रंगलेला हा भोंडला व दांडिया सोहळा विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे अविस्मरणीय ठरला.












